• केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री श्री. प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते ‘कनेक्टिंग, कम्युनिकेशन, चेंजिंग’ या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे अनावरण संपन्न झाले. सदर पुस्तक हे श्री. व्यंकैया नायडू यांच्या ३ वर्षांच्या उपराष्ट्रपती पदावर आधारित आहे. व्यंकय्या नायडू यांनी ११ ऑगस्ट २०२० रोजी उपराष्ट्रपती पदाची ३ वर्षे पूर्ण केली आहेत.

ठळक मुद्दे

  • उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या भाषणांचा संग्रह आहे. सदर पुस्तक २५० हून अधिक पृष्ठांचे असून या पुस्तकाची ही तिसरी मालिका आहे.

  • उपराष्ट्रपती आणि राज्यसभा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आणि निकालांची झलक सदर पुस्तक दाखवते.