-
भारतीय जीवन विमा निगममार्फत (Life Insurance Corporation of India - LIC) विकास अधिकाऱ्यांच्या विशेष वापराकरिता 'प्रगती (PRAGATI)' नावाच्या मोबाईल अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
'प्रगती (PRAGATI)' म्हणजेच 'Performance Review Application, Growth And Trend Indicator' होय.
-
कामकाज सुलभ करण्याच्या उद्देशासाठी LIC ग्राहक-केंद्रित तसेच डिजीटल पुढाकार घेताना दिसून येत आहे.
LIC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: LIC म्हणजेच Life Insurance Corporation of India अर्थात भारतीय जीवन विमा निगम होय.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे LIC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: एम. आर. कुमार हे सध्या LIC च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १ सप्टेंबर १९५६ रोजी LIC ची स्थापना करण्यात आली होती.