-
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Union Public Service Commission - UPSC) अध्यक्षपदी शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक श्री. प्रदीपकुमार जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
UPSC च्या अध्यक्षपदाची मुदत पूर्ण करणाऱ्या अरविंद सक्सेना यांच्यानंतर ते आपला पदभार सांभाळतील.
-
छत्तीसगड आणि मध्य प्रदेश राज्यांच्या लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष असलेले श्री. जोशी मे २०१५ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून रुजू झाले.
-
UPSC चे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ १२ मे २०२१ पर्यंत राहील.
केंद्रीय लोकसेवा आयोगाबाबत (UPSC) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १ ऑक्टोबर १९२६ रोजी केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे मुख्यालय आहे.
-
आयोगाचे अध्यक्ष: प्रदीपकुमार जोशी हे सध्या आयोगाचे नवनियुक्त अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.