• ‘अनाथांची माय (Mother of Orphans)’ म्हणून सुपरिचित असणाऱ्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.

ठळक मुद्दे

  • त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

  • त्या ‘सिंधुताई’ किंवा ‘माई’ अशा नावानेही परिचित होत्या.

  • २०२१ मध्ये त्यांना 'सामाजिक कार्य श्रेणीत (Social Work category)' पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

  • २०१० मध्ये त्यांच्या जीवनावर 'मी सिंधुताई सपकाळ' नावाचा चित्रपट निर्माण करण्यात आला होता.