-
गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank of India - RBI) ६ सदस्यीय पतधोरण समितीमार्फत धोरणात्मक दरांची स्थिती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
रेपो दर ४ % इतका स्थिर आहे.
-
रिव्हर्स रेपो दर ३.३५ % इतका स्थिर आहे.
चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय
-
पॉलिसी रेपो दर: ४ %
-
रिव्हर्स रेपो दर: ३.३५ %
-
सीमान्त स्थायी सुविधा (MSF) दर: ४.२५%
-
बँक दर: ४.२५ %
-
CRR: ३%
-
SLR: १८%
RBI बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: RBI म्हणजेच Reserve Bank of India अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया होय.
-
सध्याचे गव्हर्नर: शक्तीकांत दास हे सध्या RBI चे २५ वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई येथे RBI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
स्थापना: १ एप्रिल १९३५ रोजी कोलकाता येथे RBI ची स्थापना झाली होती.