• केरळ पोलिसांमार्फत महिलांच्या संरक्षणासाठी नुकतेच ‘पिंक प्रोटेक्शन (Pink Protection)’ नावाच्या अभिनव प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सार्वजनिक, खासगी आणि डिजिटल ठिकाणांवर महिलांची सुरक्षा पाहणे या मुख्य उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.

  • सदर उपक्रमांतर्गत हुंड्याशी निगडित मुद्दे तसेच सायबर-गुंडगिरी यांना अटकाव घालणे या बाबी प्रामुख्याने अधोरेखित करण्यासारख्या आहेत.

केरळ राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी केरळला राज्याचा दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: तिरुवनंतपूरम ही केरळ राज्याची सध्याची राजधानी आहे.

  • राज्यपाल: आरिफ मोहम्मद खान हे केरळच्या राज्यपाल पदावर आहेत.

  • मुख्यमंत्री: पिनाराई विजयन हे सध्या केरळच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.