-
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री श्री. नरेंद्रसिंग तोमर यांच्या हस्ते पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील फगवारा येथील जवळपास १०७ कोटी रुपयांच्या मेगा फूड पार्कचे व्हर्च्युअली उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
आतापर्यंत संपूर्ण देशभरात ३७ मेगा फूड पार्क्सना मंजूरी मिळाली असून त्यापैकी २० पार्क्सवर कामकाज सुरू करण्यात आले आहे.
-
सदर मेगा फूड पार्क जवळपास ५५ एकर क्षेत्रात पसरले असून त्याचा सुमारे २५००० शेतकर्यांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे.
पंजाब राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: व्ही. पी. सिंग बदनोरे हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: अमरिंदर सिंग हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राजधानीचे शहर: चंदिगढ हे पंजाबच्या राजधानीचे शहर आहे.