-
भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) IDBI बँकेवरील सुधारित नियामक पर्यवेक्षण निर्बंध (Prompt Corrective Action - PCA) हटविण्यात आले आहेत.
ठळक मुद्दे
-
३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिमाहीच्या प्रकाशित निकालांनुसार, बँक नियामक भांडवल, निव्वळ NPA आणि लाभ प्रमाणानुसार अटींचा भंग करत नाही.
IDBI बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: IDBI म्हणजेच Industrial Development Bank of India अर्थात भारतीय औद्योगिक विकास बँक होय.
-
स्थापना वर्ष: १ जुलै १९६४ रोजी IDBI बँकेची स्थापना करण्यात आली होती.
-
अध्यक्ष: एम. आर. कुमार हे सध्या IDBI बँकेच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: राकेश शर्मा हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे IDBI बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.