-
भारतीय नौदल आणि व्हिएतनाम नौदलांदरम्यान दक्षिण चीन समुद्रामध्ये नाविक अभ्यास 'पॅसेक्स (PASSEX) - २०२०' घेण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
दोन्ही देशांदरम्यान सागरी सहकार्य वाढविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सदर २ दिवसीय अभ्यास आयोजित करण्यात आला आहे.
-
भारतीय नौदल जहाज किल्तान (Kiltan) चा सदर अभ्यासात सहभाग नोंदविण्यात आला.
-
मिशन सागर - ३ (Sagar-III) अंतर्गत INS किल्तान पूरग्रस्तांसाठी १५ टन मदत साहित्य पुरवण्यासाठी हो - ची - मिन्ह शहरातील व्हिएतनामच्या न्हा रोंग बंदरावर पोहोचले.
भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
नौदल प्रमुख: अॅडमिरल करंबीर सिंग सध्या नौदल प्रमुख पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १६१२ साली भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.
-
नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.