-
ओडीशाचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्यामार्फत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ‘परेशराम (Pareshram)’ पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर पोर्टलसह इतर ऑनलाईन सेवा 'व्यवसाय सुलभतेमध्ये (Ease of Doing Business)' उपयोगी पडून राज्याच्या औद्योगिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देतील अशी अपेक्षा आहे.
-
येत्या काळात पोर्टल ५२ प्रकारच्या विविध सेवा प्रदान करेल अशी अपेक्षा आहे.
-
पोर्टलच्या माध्यमातून विविध कामगार कायद्यांविषयीची माहिती उपलब्ध होऊन विविध उद्योग, व्यापारी संस्था आणि जनता या सर्वांचा फायदा होण्याची चिन्हे आहेत.
ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
-
राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.
-
राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.