• भारतीय नौदलामार्फत भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (Bharat Electronics Limited - BEL) सोबत लेझर डॅझलर्स (Light Amplification by Stimulated Emission of Radiation Dazzlers - LASER Dazzlers) च्या प्रारंभिक पुरवठ्यासाठी करार करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • संरक्षण संशोधन व विकास संघटनेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) लेझर डॅझलर्स तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून त्याचे उत्पादन BEL पुणे द्वारे करण्यात येईल अशी अपेक्षा आहे.

  • सशस्त्र सैन्यासाठी प्रथमच अशा स्वरूपाचे स्वदेशी उत्पादन विकसित करण्यात येत आहे.

BEL बाबत महत्वपूर्ण माहिती 

  • अर्थ: BEL म्हणजेच Bharat Electronics Limited अर्थात भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड होय.

  • अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक: एम. व्ही. गौतम हे सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: बेंगळूरू हे BEL च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९५४ साली BEL ची स्थापना करण्यात आली होती.

भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • नौदल प्रमुख: अ‍ॅडमिरल करंबीर सिंग सध्या नौदल प्रमुख पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १६१२ साली भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.

  • नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.