• ओडीशा केडरचे आयपीएस अधिकारी पी. एस. रानीपसे यांची केंद्रीय राखीव पोलीस दलात (Central Reserve Police Force - CRPF) महानिरीक्षक (Inspector General - IG) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • श्री. रानीपसे सामील झाल्यापासून ५ वर्षांच्या कालावधीसाठी केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हे पद सांभाळतील.

CRPF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: CRPF म्हणजेच 'केंद्रीय राखीव पोलीस दल' होय.

  • मुख्यालय: नवी दिल्ली येथे CRPF चे मुख्यालय आहे.

  • स्थापना वर्ष: २७ जुलै १९३९ रोजी CRPF ची स्थापना झाली होती.

  • उद्दिष्ट: 'सेवा आणि निष्ठा' हे CRPF चे उद्दिष्ट आहे.