• परदेशी कंपन्यांना भारतात व्यवसाय स्थापन करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी पाठिंबा देण्याच्या उद्देशाने ICICI बँकेमार्फत ‘इन्फायनाईट इंडिया (Infinite India)’ नावाच्या पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पुढाकाराच्या माध्यमातून बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या (MNC) विभागातील आपले स्थान मजबूत करणे हे ICICI बँकेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

  • भारतात येणार्‍या परदेशी कंपन्यांशी भागीदारी करण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञानाधारित सक्षम बाबींना अधिक मजबूत करणे हा या धोरणाचा गाभा आहे.

ICICI बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICICI म्हणजेच Industrial Credit and Investment Corporation of India होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे ICICI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: गिरीश चंद्र चतुर्वेदी हे सध्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बक्षी सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • बँकेची टॅगलाईनः 'हम है ना, खयाल आपका' ही ICICI बँकेची टॅगलाईन आहे.