• ICICI बँकेमार्फत ‘ट्रेड इमर्ज (Trade Emerge)’ नावाच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • भारतीय निर्यातदार तसेच आयातदारांना डिजीटल बँकिंग आणि मूल्यवर्धित सेवा प्रदान देण्यासाठी सदर प्लॅटफॉर्मचे अनावरण करण्यात आले आहे.

  • बँकेचे ग्राहक नसलेले निर्यातदार तसेच आयातदारही सदर प्लॅटफॉर्मचा लाभ घेऊ शकतात.

ICICI बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICICI म्हणजेच Industrial Credit and Investment Corporation of India होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे ICICI च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: गिरीश चंद्र चतुर्वेदी हे सध्या अध्यक्षपदावर विराजमान आहेत.

  • व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी: संदीप बक्षी सध्या या पदावर कार्यरत आहेत.

  • बँकेची टॅगलाईनः 'हम है ना, खयाल आपका' ही ICICI बँकेची टॅगलाईन आहे.