-
'वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रीड' (One Sun, One World, One Grid - OSOWOG) योजना पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. सदर योजनेअंतर्गत जगभरात सौर ऊर्जा पुरवण्यासाठी ट्रान्स-नॅशनल इलेक्ट्रिक ग्रीड ची योजना आखण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालयाने (Ministry of New and Renewable Energy - MNRE) तयार केलेल्या मसुद्याच्या आराखड्यानुसार OSOWOG द्वारे १४० देशांना एका सामान्य ग्रीडच्या माध्यमातून जोडण्यात येईल ज्याचा उपयोग सौरऊर्जा हस्तांतरित करण्यासाठी केला जाईल.
-
OSOWOG सेवेमागील 'सूर्याचा कधीही अस्त होत नाही (The Sun Never Sets)' असे ब्रीदवाक्य आहे आणि जगातील कोणत्याही भौगोलिक ठिकाणी, कोणत्याही ठराविक वेळेस स्थिर असते अशी संकल्पना आहे.
नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालयाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९९२ साली नवीन आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जा मंत्रालयाची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
राज्यमंत्री: राज कुमार सिंग हे सध्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.