-
नॉर्वेजियन नोबेल समितीमार्फत 'वर्ल्ड फूड प्रोग्रामला (World Food Programme - WFP)' २०२० सालासाठीचा शांततेचा नोबेल पुरस्कार (Nobel Peace Prize) जाहीर करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
-
'वर्ल्ड फूड प्रोग्राम' ही जागतिक स्तरावरील सर्वात मोठी मानवतावादी संस्था म्हणून कार्यरत आहे.
-
सदर संस्थेमार्फत उपासमारीच्या प्रश्नाला वाचा फोडण्याची आणि अन्नसुरक्षेला प्रोत्साहन देण्याची उल्लेखनीय जबाबदारी पार पाडली जात आहे.
वर्ल्ड फूड प्रोग्रामबाबत (World Food Programme) महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: १९६१ साली सदर संस्थेची स्थापना करण्यात आली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: इटलीमधील रोम हे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
सध्याचे अध्यक्ष: डेव्हिड बीस्ले हे सध्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.
-
संस्थेचा प्रकार: आंतरसरकारी, नियामक आणि सल्लागार अशा स्वरूपात ही संस्था कार्यरत आहे.
-
पालक संस्था: संयुक्त राष्ट्र आमसभा ही वर्ल्ड फूड प्रोग्रामची पालक संस्था आहे.