• सरकारी धोरणांची प्रभावितता वाढविण्यासाठी आणि सोयीस्कर अशा नियामक चौकटीला प्रोत्साहित करण्यासाठी नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक २०२० द्वारे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • भारतीय राज्यांच्या निर्यातीची सुसज्जता व कामगिरीचे परीक्षण करणारा हा देशातील पहिला अहवाल आहे.

  • आव्हाने आणि संधी ओळखणे हे सदर अहवालाचे मुख्य उद्दिष्ट मानण्यात आले होते.

  • निर्यात सुसज्जता निर्देशांक २०२० मध्ये गुजरात राज्याने अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

निर्देशांक अहवालातील अव्वल क्रमवारीची राज्ये

  • गुजरात

  • महाराष्ट्र

  • तमिळनाडू

नीती (NITI) आयोगाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: NITI म्हणजेच National Institution for Transforming India अर्थात भारत परिवर्तनासाठी राष्ट्रीय संस्था होय.

  • स्थापना वर्ष: १ जानेवारी २०१५ साली नीती आयोगाची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे नीती आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाच्या अध्यक्ष पदावर आहेत.

  • उपाध्यक्ष: राजीव कुमार हे नीती आयोगाच्या उपाध्यक्ष पदावर आहेत.

  • मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ कांत हे नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आहेत.