-
नीती आयोगाच्या 'SDG इंडिया इंडेक्स (SDG India Index)' २०२०-२१ च्या तिसर्या आवृत्तीत केरळ सर्वोत्कृष्ट कामगिरीसह अव्वल स्थानी तर बिहार सर्वात वाईट कामगिरीसह तळाच्या स्थानावर विराजमान झाले आहे.
ठळक मुद्दे
-
शाश्वत विकास लक्ष्यांसाठीचा (Sustainable Development Goals - SDGs) निर्देशांक सामाजिक, आर्थिक तसेच पर्यावरणीय घटकांवर राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करतो.
-
केरळने ७५ गुणांसह अव्वल राज्याचा दर्जा कायम राखला आहे.
-
भारताच्या SDG निर्देशांकाची तिसरी प्रस्तुती निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्यामार्फत ३ जून रोजी सुरू करण्यात आली होती.
सर्वोच्च कामगिरी करणारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश गुणांसहित
-
केरळ (७५)
-
हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू (७४)
-
आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक आणि उत्तराखंड (७२)
-
सिक्कीम (७१)
-
महाराष्ट्र (७०)
सर्वात वाईट कामगिरी करणारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश गुणांसहित
-
छत्तीसगड, नागालँड आणि ओडिशा (६१)
-
अरुणाचल प्रदेश, मेघालय, राजस्थान आणि उत्तर प्रदेश (६०)
-
आसाम (५७)
-
झारखंड (५६)
-
बिहार (५२)
NITI आयोगाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: NITI म्हणजेच National Institution for Transforming India अर्थात भारत परिवर्तनासाठी राष्ट्रीय संस्था होय.
-
स्थापना वर्ष: १ जानेवारी २०१५ साली नीती आयोगाची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे नीती आयोगाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
अध्यक्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाच्या अध्यक्ष पदावर आहेत.
-
उपाध्यक्ष: राजीव कुमार हे नीती आयोगाच्या उपाध्यक्ष पदावर आहेत.
-
मुख्य कार्यकारी अधिकारी: अमिताभ कांत हे नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर आहेत.