• नुकतीच व्हाईस अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार यांची भारत सरकारमार्फत नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ते ३० नोव्हेंबर २०२१ पासून आपली भूमिका स्वीकारतील.

  • सध्याचे नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग यांची जागा ते घेतील.

भारतीय नौदलाबाबत महत्वपूर्ण माहिती

  • नौदल प्रमुख: अ‍ॅडमिरल आर. हरी कुमार सध्या नौदल प्रमुख पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १६१२ साली भारतीय नौदलाची स्थापना करण्यात आली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय नौदलाच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • ब्रीदवाक्य: 'शं नो वरुणः' हे नौदलाचे ब्रीदवाक्य आहे.

  • नौदल दिन: दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो.