• भारतीय रिझर्व्ह बँकेमार्फत (Reserve Bank of India - RBI) १ ऑक्टोबर २०२० पासून मुरली रामकृष्णन यांची साउथ इंडियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • ३० मे २०२० रोजी रामकृष्णन हे ICICI बँकेमधून सामरिक प्रकल्प गटामध्ये वरिष्ठ महाव्यवस्थापक पदावरून निवृत्त झाले होते.

  • १ जुलै २०२० रोजी त्यांची साउथ इंडियन बँकेत सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

साउथ इंडियन बँकेबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: १९२९ साली साउथ इंडियन बँकेची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: केरळमधील थ्रिसूर हे बँकेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • बँकेची टॅगलाईन: 'Experience Next Generation Banking' ही बँकेची टॅगलाईन आहे.