-
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत कार्यरत राष्ट्रीय माहिती केंद्रामार्फत (National Informatics Centre - NIC) 'संदेस (Sandes)' नावाच्या नवीन तात्काळ संदेश प्रणालीचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
व्हॉट्सअॅप प्रमाणेच ही सुविधा कार्य करते.
-
नवीन शासकीय तात्काळ संदेश प्रणाली (Government Instant Messaging Systems - GIMS) मोबाईल क्रमांक किंवा ईमेल आयडी वापरणार्या कोणालाही सर्व प्रकारच्या संप्रेषणासाठी वापरता येईल अशी सुविधा पुरविण्यात आली आहे.
NIC बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: NIC म्हणजेच National Informatics Centre अर्थात राष्ट्रीय माहिती केंद्र होय.
-
स्थापना वर्ष: १९७६ साली NIC ची स्थापना करण्यात आली होती.
-
महासंचालक: नीता वर्मा सध्या NIC च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे NIC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.