• ऑकलंडमधील व्यावसायिक वकील आणि न्यूझीलंड क्रिकेटचे (New Zealand Cricket - NZC) संचालक ग्रेग बार्कले यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (International Cricket Council - ICC) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • पदभार सोडलेल्या शशांक मनोहर यांच्यानंतर बार्कले पदभार स्वीकारतील आणि सध्याचे अंतरिम अध्यक्ष इम्रान ख्वाजा यांची जागा घेतील.

  • ICC मंडळावर न्यूझीलंड क्रिकेटचे प्रतिनिधी म्हणून तसेच ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक २०१५ चे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले होते.

ICC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: ICC म्हणजेच International Cricket Council अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद होय.

  • स्थापना वर्ष: १५ जून १९०९ रोजी ICC ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: दुबई, अरब अमिराती हे ICC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • सध्याचे चेअरमन: ग्रेग बार्कले हे सध्या ICC च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळत आहेत.

  • सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी: मनु सावनी हे सध्या ICC च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सांभाळत आहेत.

  • सदस्य देश: जगभरातील १०४ देश ICC चे सदस्य देश आहेत.

  • ब्रीदवाक्य: 'Cricket for good' हे ICC चे ब्रीदवाक्य आहे.