• भारतीय वायूसेना उपप्रमुख एअर मार्शल विवेक राम चौधरी यांची नुकतीच नूतन वायूसेना प्रमुख (Chief of Air Staff) पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सध्याचे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया हे ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.

  • एअर मार्शल एच. एस. अरोरा निवृत्त झाल्यानंतर चौधरी यांनी या वर्षी उपप्रमुख पदाचा पदभार स्वीकारला होता.

IAF बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IAF म्हणजेच Indian Air Force अर्थात भारतीय हवाई दल होय.

  • प्रमुख: विवेक राम चौधरी हे वायुसेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी वायुसेनेची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली हे IAF च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • ब्रीदवाक्य: 'नभः स्पृशं दीप्तम्' हे IAF चे ब्रीदवाक्य आहे.