-
केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल यांच्यामार्फत व्हिडिओ-कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवी दिल्ली येथील 'जागतिक पुस्तक मेळावा (World Book Fair)' २०२१ चे उद्घाटन करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
नॅशनल बुक ट्रस्टच्या (National Book Trust - NBT) वतीने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
-
सदरची वार्षिक कार्यक्रमाची २९ वी आवृत्ती असून कोविड - १९ मुळे पहिल्यांदा हा मेळावा व्हर्च्युअल स्वरूपात घेण्यात आला आहे.
-
२०२१ च्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळाव्याची थीम 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (National Education Policy) - २०२०’ अशी आहे.