• युनियन बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असणाऱ्या राजकिरण राय यांची २०२०-२१ या कालावधीसाठी भारतीय बँकांच्या संघटनेच्या (Indian Banks’ Association - IBA) अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • SBI प्रमुख पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी IBA चे अध्यक्ष म्हणून रजनीश कुमार यांचे स्थान प्राप्त केले आहे.

  • संघटनेच्या उपाध्यक्षपदी स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेशकुमार खारा यांची निवड करण्यात आली आहे.

IBA बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IBA म्हणजेच Indian Banks’ Association अर्थात भारतीय बँकांची संघटना होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे IBA च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: सप्टेंबर १९४६ मध्ये IBA ची स्थापना करण्यात आली होती.