• आदिवासी व्यवहारांसाठी उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence for Tribal Affairs), आदिवासी व्यवहार मंत्रालय (Ministry of Tribal Affairs) आणि भारतीय लोक प्रशासन संस्था (Indian Institute of Public Administration - IIPA) मार्फत २ दिवसीय 'राष्ट्रीय आदिवासी संशोधन परिषदेचे (National Tribal Research Conclave)' आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्दे

  • सदर अधिवेशनाच्या उद्घाटन सत्राला केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री श्री. अर्जुन मुंडा यांनी संबोधित केले.

  • आदिवासी व्यवहार मंत्रालयाने सुरू केलेल्या प्रकल्पांच्या निकालांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आदिवासी संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

  • सदर संमेलनात विविध राज्यांतील आदिवासी व्यवहार मंत्र्यांसह देशभरातून १०० हून अधिक जण सहभागी झाले होते.

  • भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या (Indian Institute of Public Administration - IIPA) सहकार्याने सुरू करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आदिवासी संशोधन संस्थेचा मार्गदर्शक आराखडाही या बैठकीत सादर करण्यात आला होता.