• २०२१ साली साजऱ्या होणाऱ्या पहिल्यावहिल्या 'राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याचे (National Road Safety Month)' उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंग आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याची ही पहिलीच आवृत्ती आहे.

  • सदर महिन्याची संकल्पना मागील काही वर्षांपासून साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाऐवजी आखली जात आहे.

  • रस्ता सुरक्षेविषयी जनजागृती करणे तसेच भारतातील रस्ते अपघात कमी करणे हे १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत साजऱ्या होणाऱ्या या महिन्याभराच्या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

राष्ट्रीय रस्ता सुरक्षा महिन्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • सदर कालावधीदरम्यान राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकार, NHAI, NHIDCL तसेच स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात विविध उपक्रम राबविले जातील अशी अपेक्षा आहे.

  • अभियांत्रिकी (Engineering), शिक्षण (Education), अंमलबजावणी (Enforcement) आणि आपत्कालीन सेवा (Emergency care Services) या ४ E च्या माध्यमातून रस्ता सुरक्षिततेचे पुनर्गठन व मजबूतीकरण करून रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.