• केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री. थावरचंद गहलोत यांच्यामार्फत ‘ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठीच्या राष्ट्रीय पोर्टलचे (National Portal for Transgender Persons)’ ई-अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • सदर अनावरणासोबत त्यांनी गुजरातमधील वडोदरा येथे ‘गरिमा ग्रेह: ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी निवारा गृह’ चे ई-उद्घाटन केले आहे.

  • सदर अत्यंत उपयुक्त पोर्टल ट्रान्सजेंडर व्यक्तीला देशात कोठूनही प्रमाणपत्र आणि ओळखपत्रांसाठी डिजीटल पद्धतीने अर्ज करण्यास मदत करेल अशी अपेक्षा आहे.