-
भारतीय हवाई दलामध्ये (Indian Air Force - IAF) करियर करू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांना करिअरशी संबंधित माहिती आणि तपशील प्रदान करण्यासाठी हवाई दल प्रमुख श्री. राकेशकुमारसिंग भदौरिया यांनी ‘माय आयएएफ (MY IAF)’ नावाच्या मोबाईल अॅप्लिकेशनचे अनावरण केले आहे.
ठळक मुद्दे
-
डिजीटल इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आलेले हे अॅप सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्सड कंप्यूटिंग (Centre for Development of Advanced Computing - C-DAC) च्या सहकार्याने विकसित केले गेले आहे.
-
सदर अॅप एक सिंगल डिजीटल व्यासपीठ म्हणून कार्य करते जिथे वापरकर्ते भारतीय वायुसेनेमध्ये अधिकारी तसेच एअरमन या दोन्ही पदांसाठीच्या निवड प्रक्रिया, प्रशिक्षण अभ्यासक्रम, वेतन व भत्ता इत्यादी बाबींचा तपशील शोधू शकतात.
भारतीय वायुसेनेबाबत महत्वपूर्ण माहिती
-
स्थापना वर्ष: ८ ऑक्टोबर १९३२ रोजी भारतीय वायुसेनेची स्थापना झाली होती.
-
हवाई दल प्रमुख: सध्या एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया हे IAF चे प्रमुख आहेत.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे भारतीय वायुसेनेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
-
वायुसेना दिवस: ८ ऑक्टोबर हा दरवर्षी वायुसेना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
-
ब्रीदवाक्य: 'नभः स्पृशं दीप्तम्' हे IAF चे ब्रीदवाक्य आहे.