• रहदारीच्या सिग्नल्सवर महिलांचे प्रतीक दर्शवणारे मुंबईतील दादर हे भारतातील पहिले शहर बनले आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टीकोनातून उचलण्यात आलेले हे पाऊल कौतुकास्पद प्रतीत होते.

ठळक मुद्दे

  • बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत (Brihanmumbai Municipal Corporation - BMC) रहदारीसाठी महिलांच्या प्रतिकांची वैशिष्ट्ये दर्शविणारे ट्रॅफिक सिग्नल्स बसवण्यात आले आहेत.

  • सदर नवीन सिग्नल्स हे पुरुषांच्या पारंपरिकदृष्ट्या चालत आलेल्या प्रतिनिधित्वाचे स्थान घेऊन समानता प्रस्थापित करण्याचे कार्य करतील अशी अपेक्षा आहे.

महाराष्ट्र राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: श्री. उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी हे सध्या महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना: १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती

  • विशेषता: क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील ३ रे मोठे राज्य आहे.

  • राजधानी: मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.

  • अधिकृत भाषा: मराठी ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा म्हणून वापरली जाते.