-
मध्य प्रदेश राज्य सरकारमार्फत नुकतीच 'मुख्यमंत्री राशन आपके द्वार योजना' लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
सदर योजना ही नोव्हेंबर २०२१ पासून सुरू होईल.
-
जेथे स्वस्त धान्य दुकाने (Fair Price Shops - FPS) उपलब्ध नसतील अशा ठिकाणी सदर योजनेअंतर्गत ग्रामस्थांच्या दारात राशन उपलब्ध करण्यात येणार आहे.
मध्य प्रदेश बाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: शिवराजसिंह चौहान हे सध्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.
-
राज्यपाल: मंगूभाई छगनभाई पटेल सध्या मध्य प्रदेशच्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.
-
राज्यनिर्मिती वर्ष: १ नोव्हेंबर १९५६ रोजी राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी: भोपाळ ही सध्या मध्य प्रदेशची राजधानी आहे.
-
राज्याची विशेषता: मध्य प्रदेश हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.