• बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यामार्फत ‘मुख्‍य मंत्री युवा उद्यमी योजना’ तसेच ‘मुख्‍य मंत्री महिला उद्यमी योजना’ नावाच्या २ महत्वाकांक्षी योजनांचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • राज्यातील सर्व विभागातील तरुण व महिलांमध्ये उद्योजकतेला चालना देण्यासाठी सदर योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

बिहार राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: फागु चौहान हे सध्या बिहारचे राज्यपाल आहेत.

  • मुख्यमंत्री: नितीशकुमार हे सध्या बिहारचे मुख्यमंत्री आहेत.

  • स्थापना वर्ष: १९१२ साली बिहार राज्याची स्थापना करण्यात आली होती.

  • राज्य दर्जा प्राप्त वर्ष: १९५० साली बिहारला राज्य दर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: पटना ही बिहारची राजधानी आहे.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने बिहारचा देशात १२ वा क्रमांक लागतो.