-
गुजरात सरकारने 'मुख्यमंत्री किसान सहाय योजना' ही नवीन योजना सुरू केली. सदर योजना राज्यातील प्रधानमंत्री फसल विमा योजनेची केवळ चालू वर्षासाठी जागा घेईल.
ठळक मुद्दे
-
विमा कंपन्यांनी यावेळी सरकारकडून अधिक प्रिमीयम मागितला असल्याने ही योजना बदलली जात आहे.
-
सदर योजना आमलात येऊन मंजूर झाल्यास राज्य सरकारला साडेचार हजार कोटी रुपये द्यावे लागतील.
-
वार्षिक प्रिमीयम १८०० कोटींच्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे.
-
अतिवृष्टी, दुष्काळ किंवा अवकाळी पावसामुळे पिकाचे ३३% पेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास नुकसान भरपाई दिली जाईल.
-
सदर योजनेंतर्गत एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त ४ हेक्टर जागेची नुकसान भरपाई मिळू शकते.