• मेघालय पोलीस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्यात शिलाँग ट्रॅफिक पोलीस (Shillong Traffic Police - STP) हद्दीत ई - चलनाची अंमलबजावणी करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • सदर ई-चलन सुविधा हा डिजीटल ट्रॅफिक अंमलबजावणीचा उपाय आहे.

  • या सुविधेच्या माध्यमातून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना दंड करणे आणि चलन तयार करणे हे डिजीटल स्वरूपात करण्यात येणार आहे.

मेघालय राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: कॉनराड संगमा हे सध्या मेघालय राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: २१ जानेवारी १९७२ रोजी मेघालय राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: शिलॉंग ही मेघालय राज्याची राजधानी आहे.