-
जलविभागाबाबत गुजरात सरकारमार्फत डेन्मार्क देशासोबत ५ वर्षांच्या सामंजस्य करारावर (Memorandum of Understanding - MoU) स्वाक्षरी करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
गुजरात पाणीपुरवठा व सांडपाणी मंडळामार्फत राज्य सरकारच्या सहाय्याने ऑनलाईन संवादात्मक व्यासपीठाच्या माध्यमातून ‘डॅनिश वॉटर फोरम (Danish Water Forum)’ सह सामंजस्य करार करण्यात आला आहे.
-
सदर सामंजस्य कराराद्वारे प्रशिक्षण, क्षमतावृद्धी, ज्ञान विनिमय, तंत्रज्ञान देवघेव, पाणीपुरवठा सहकार्य, सांडपाणी प्रक्रिया-पुनर्वापर याबाबत पाणी व्यवस्थापनास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
गुजरात राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: विजयभाई आर. रुपाणी हे सध्या गुजरातच्या मुख्यमंत्री पदावर आहेत.
-
राज्यपाल: आचार्य देव व्रत हे सध्या गुजरातच्या राज्यपाल पदावर आहेत.
-
स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी गुजरात राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानी: गांधीनगर ही गुजरातची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने गुजरातचा देशात ५ वा क्रमांक लागतो