• भारतीय विज्ञान संस्था (Indian Institute of Science - IISc) आणि इंडियन ऑईल (Indian Oil Corporation Limited - IOCL) संशोधन व विकास केंद्र (Research and Development Centre) यांच्यादरम्यान हायड्रोजन - निर्मिती तंत्रज्ञानासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे

  • बायोमास गॅसिफिकेशन-आधारित हायड्रोजन निर्मिती तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला आहे.

  • परवडणाऱ्या किंमतीत इंधन सेल-ग्रेड हायड्रोजन तयार करण्यासाठी सदर तंत्रज्ञान वापरले जाईल अशी अपेक्षा आहे.

IISc बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IISc म्हणजेच Indian Institute of Science अर्थात भारतीय विज्ञान संस्था होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: बेंगळुरू, कर्नाटक येथे IISc च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • संचालक: गोविंदन रंगराजन हे सध्या संचालक पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १९०९ साली IISc ची स्थापना करण्यात आली होती.

  • संस्थापक: जमशेदजी टाटा आणि कृष्णराज वाडियार यांनी मिळून संस्थापक पदाची जबाबदारी पार पाडली होती.

IOCL बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: IOCL म्हणजेच Indian Oil Corporation Limited अर्थात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड होय.

  • सध्याचे अध्यक्षः श्रीकांत माधव वैद्य हे सध्या अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे संस्थेच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • स्थापना वर्ष: १९५९ साली संस्थेची स्थापना करण्यात आली होती.