-
संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) 'रक्षित (Rakshita)' नावाची मोटार बाईक रुग्णवाहिका केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (Central Reserve Police Force - CRPF) सोपविण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
भारतीय सुरक्षा दलांना आणि आपत्कालीन आरोग्य सेवा पुरवणाऱ्या ग्राहकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यात मोटार बाईक रुग्णवाहिका मदत करेल अशी अपेक्षा आहे.
DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.
-
अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.
-
स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.
-
मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.
-
संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.
CRPF बाबत महत्वपूर्ण माहिती
-
अर्थ: CRPF म्हणजेच Central Reserve Police Force अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दल होय.
-
महासंचालक: ए. पी माहेश्वरी हे सध्या CRPF च्या महासंचालक पदावर कार्यरत आहेत.
-
स्थापना वर्ष: १९३९ साली CRPF ची स्थापना करण्यात आली होती.
-
ब्रीदवाक्य: 'सेवा और निष्ठा (Service and Loyalty)' हे CRPF चे ब्रीदवाक्य आहे.