-
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागानुसार (Department of Science and Technology - DST) भारतीय सुपर कॉम्प्यूटर परमसिद्धीने (Param Siddhi) जगातील ५०० सर्वात शक्तिशाली सुपर कॉम्प्यूटर्सच्या यादीत ६३ वा क्रमांक प्राप्त केला आहे.
ठळक मुद्दे
-
परमसिद्धी हा सी-डॅक येथे राष्ट्रीय सुपरकंप्युटिंग मिशन (National Supercomputing Mission - NSM) अंतर्गत स्थापन करण्यात आलेला उच्च-कार्यक्षमता संगणकीय-कृत्रिम बुद्धिमत्ता (High-Performance Computing-Artificial Intelligence - HPC-AI) प्रकारचा सुपर कॉम्प्यूटर आहे.
-
जगातील अव्वल ५०० विना-वितरित संगणक प्रणालींमध्ये अव्वल क्रमांकावर असणारे ५०० प्रकल्प वर्षातून दोनदा प्रकाशित करण्यात येतात.