-
केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. रमेश पोखरियाल 'निशंक' यांच्या हस्ते 'इंग्लिशप्रो (EnglishPro)' नावाच्या मोबाईल अॅपचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
सदर मोबाईल अॅप्लिकेशन हे इंग्रजी आणि विदेशी भाषा विद्यापीठ (English and Foreign Languages University), हैदराबाद मार्फत विद्यापीठ सामाजिक उत्तरदायित्व (University Social Responsibility - USR) अंतर्गत विकसित करण्यात आले आहे.
-
सदर अॅप एक उपयुक्त डिजीटल साधन म्हणून कार्य करेल आणि शिक्षक, विद्यार्थी तसेच विविध पार्श्वभूमीतील लोकांसाठी उत्तम स्वरूपाचा शैक्षणिक स्त्रोत म्हणून उपयोगात येईल अशी अपेक्षा आहे.
-
देशातील कोणत्याही विद्यापीठाचा अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.