-
सरकारी धोरणांवरील नागरिकांच्या अभिप्रायाच्या आधारे नागरिक-केंद्रित सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यामार्फत 'पीआर इनसाईट (PR Insight)’ नावाच्या मोबाईल अॅप आणि वेब पोर्टलचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
लोकांच्या अभिप्रायाच्या निरीक्षणावरून त्यांच्या समाधानासाठी राज्य सरकारच्या विद्यमान योजना आणि कार्यक्रम यांची दिशा निश्चित करणे हे सदर पोर्टलचे मुख्य उद्दिष्ट आहे.
पंजाब राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: व्ही. पी. सिंग बदनोरे हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: अमरिंदर सिंग हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राजधानीचे शहर: चंदिगढ हे पंजाबच्या राजधानीचे शहर आहे.