• राजस्थान राज्य सरकारमार्फत नुकतेच ‘मिशन निर्यातक बनो (Mission Niryatak Bano)' अभियानाचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • राजस्थान उद्योग विभाग तसेच राजस्थान राज्य औद्योगिक विकास आणि गुंतवणूक महामंडळ (Rajasthan State Industrial Development and Investment Corporation - RIICO) यांच्यामार्फत राज्यामधील इच्छुक निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर अभियानाचे अनावरण केले आहे.

राजस्थान राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: अशोक गेहलोत हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.

  • राज्यपाल: कलराज मिश्रा हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: ३० मार्च १९४९ रोजी राजस्थानची स्थापना करण्यात आली होती.

  • भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान हे भारतातील अव्वल क्रमांकाचे राज्य आहे.