• कोविड - १९ रुग्णांना ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटर आणि प्लाझ्मा मिळावेत या उद्देशाने उत्तराखंड पोलिसांमार्फत 'मिशन हौसला (Mission Hausla)' नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • याशिवाय मोहिमेचा एक भाग म्हणून पोलिस कोविड - १९ व्यवस्थापनासाठी लोकांना औषधे मिळविण्यात मदत करतील.

उत्तराखंड राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • स्थापना वर्ष: ९ नोव्हेंबर २००० साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली होती.

  • मुख्यमंत्री: तीरथसिंग रावत हे सध्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • राज्यपाल: बेबी राणी मौर्य सध्या राज्यपाल पदावर विराजमान आहेत.

  • राजधानी: उत्तराखंड राज्याच्या गैरसैंण (उन्हाळी) आणि देहरादून (हिवाळी) अशा २ राजधान्या आहेत.