-
महिला प्रवाशांना सुरक्षा मिळावी या उद्देशाने रेल्वे सुरक्षा दलामार्फत (Railway Protection Force - RPF) आंध्र प्रदेश एक्स्प्रेसवर ‘मेरी सहेली (Meri Saheli)’ नावाचा उपक्रम राबविण्यास सुरवात करण्यात आली आहे.
'मेरी सहेली’ उपक्रमाबाबत महत्वपूर्ण माहिती
-
संपूर्ण ट्रेन प्रवासामध्ये प्रवास करणार्या महिला प्रवाशांना सुरक्षितता प्रदान करणे हे ‘मेरी सहेली’ या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
-
महिला उपनिरीक्षक आणि RPF च्या महिला कॉन्स्टेबलचा एक चमू महिला प्रशिक्षकांसह सर्व डब्यांमध्ये उपस्थित राहील.
-
प्रवाशांना प्रवासादरम्यानच्या सर्व खबरदारीसाठी १८२ हा मदत क्रमांक पुरवण्यात आला आहे.