• देशातील ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ प्रणाली सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत 'मेरा राशन (Mera Ration)' नावाच्या मोबाईल अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे

  • नजीकची वाजवी किंमतीची दुकाने शोधण्यासाठी नागरिकांना याचा फायदा होईल.

  • सदर अ‍ॅपचा फायदा विशेषतः अशा रेशनकार्ड धारकांना होईल जे रोजगारासाठी नवीन क्षेत्रामध्ये जातात.

  • बहुविध सेवा पुरविण्यासाठी सरकारने हे अ‍ॅप तयार केले आहे.