-
पंजाबचे मुख्यमंत्री श्री. चरणजीत सिंग चन्नी यांच्यामार्फत नुकतेच 'मेरा घर मेरे नाम' नावाच्या योजनेचे अनावरण करण्यात आले आहे.
ठळक मुद्दे
-
गाव तसेच शहरांच्या 'लाल लकीर' मधील घरात राहणाऱ्या लोकांना मालकी हक्क प्रदान करणे हा सदर योजनेचा मुख्य उद्देश आहे.
-
जमिनीचा असा परिसर जो गावाच्या वस्तीचा एक भाग आहे आणि केवळ बिगर शेती उद्देशांसाठी वापरण्यात येतो त्याला 'लाल लकीर' असे म्हणतात.
पंजाब राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
राज्यपाल: बनवारीलाल पुरोहित हे सध्या राज्यपाल पदावर कार्यरत आहेत.
-
मुख्यमंत्री: चरणजित सिंग चन्नी हे सध्या मुख्यमंत्री पदावर कार्यरत आहेत.
-
राजधानीचे शहर: चंदिगढ हे पंजाबच्या राजधानीचे शहर आहे.