• पुरुष हॉकी कनिष्ठ विश्वचषकाचे (Men’s Hockey Junior World Cup) आयोजन ओडीशामार्फत करण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे

  • सदर स्पर्धा ही २४ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधी दरम्यान कलिंग स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार आहे.

  • राज्याचे मुख्यमंत्री श्री. नवीन पटनाईक यांच्यामार्फत लोगो आणि ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले आहे.

ओडीशा राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • राज्यपाल: गणेशीलाल हे सध्या ओडीशा राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • मुख्यमंत्री: नवीन पटनाईक हे सध्या ओडीशा राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.

  • राज्यदर्जा प्राप्त वर्ष: १ एप्रिल १९३६ रोजी ओडीशाला राज्यदर्जा प्राप्त झाला होता.

  • राजधानी: भुवनेश्वर ही ओडीशा राज्याची राजधानी आहे.