• १८ ऑगस्ट २०२० पासून मेघालयचे राज्यपाल म्हणून सत्य पाल मलिक यांची भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी नियुक्ती केली. त्यापूर्वी ते गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यभार सांभाळत होते.

ठळक मुद्दे

  • सत्यपाल मलिक यांनी तथागत रॉय यांच्या जागी राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळण्यास घेतला.

  • सदर स्थित्यंतरादरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना त्यांच्या स्वत:च्या कर्तव्यांव्यतिरिक्त गोव्याचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

  • सत्य पाल मलिक यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून यापूर्वी काम पाहिले आहे.

  • त्यांनी जम्मू-काश्मीरचे पूर्व राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे.

  • त्यांच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम ३७० रद्द करण्याचा घटनात्मक निर्णय ऑगस्ट २०१९ मध्ये घेण्यात आला होता.

  • गोव्याचे राज्यपाल म्हणून ऑक्टोबर २०१९ मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती.

मेघालय राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती

  • मुख्यमंत्री: कॉनराड संगमा हे सध्या मेघालय राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत.

  • स्थापना वर्ष: २१ जानेवारी १९७२ रोजी मेघालय राज्याची स्थापना झाली होती.

  • राजधानी: शिलॉंग ही मेघालय राज्याची राजधानी आहे.