• बी. सी. पटनायक यांची नुकतीच 'भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (Life Insurance Corporation of India)' व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • सदर पदभार स्वीकारण्यापूर्वी पटनायक हे 'विमा लोकपाल परिषदेचे (Council for Insurance Ombudsmen - CIO)' महासचिव होते.

LIC बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: LIC म्हणजेच Life Insurance Corporation of India अर्थात भारतीय जीवन विमा निगम होय.

  • मुख्यालयाचे ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र हे LIC च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.

  • अध्यक्ष: एम. आर. कुमार हे सध्या LIC च्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.

  • स्थापना वर्ष: १ सप्टेंबर १९५६ रोजी LIC ची स्थापना करण्यात आली होती.