• संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेमार्फत (Defence Research and Development Organisation - DRDO) ओडीशा किनाऱ्यावर एकात्मिक चाचणी श्रेणीतून 'आकाश-एनजी (Akash-NG)' क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.

ठळक मुद्दे

  • आकाश-एनजी हे नवीन पिढीतील जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे ज्याचा भारतीय हवाई दलाने (Indian Air Force - IAF) हवाई धोके टाळण्याच्या उद्देशाने उपयोग केला.

  • प्रक्षेपण क्रियेदरम्यान सर्व उद्दिष्टांची पूर्तता करण्यात आली आहे.

DRDO बाबत महत्वपूर्ण माहिती

  • अर्थ: DRDO म्हणजेच Defence Research and Development Organisation अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था होय.

  • अध्यक्ष: डॉ. जी. सतीश रेड्डी हे सध्या DRDO चे अध्यक्ष आहेत.

  • स्थापना वर्ष: १९५८ साली DRDO ची स्थापना झाली होती.

  • मुख्यालयाचे ठिकाण: नवी दिल्ली येथे DRDO चे मुख्यालय आहे.

  • संस्थेचे ब्रीदवाक्य: 'बलस्य मूलं विज्ञानम्' हे संस्थेचे ब्रीदवाक्य आहे.