-
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराची रामसर संवर्धन करारांतर्गत (Ramsar Conservation Treaty) आंतरराष्ट्रीय महत्वाचे पाणथळ क्षेत्र म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
-
लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर अनेक वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झाले होते.
पाणथळ क्षेत्रांविषयी रामसर कराराबाबत (Ramsar Convention on Wetlands) महत्वपूर्ण माहिती
-
कराराचा प्रकार: पाणथळ क्षेत्रांवर आधारित रामसर हा आंतरराज्यीय करार आहे.
-
करार स्वीकार वर्ष: २ फेब्रुवारी १९७१ रोजी कॅस्पियन समुद्राच्या दक्षिणेकडील इराणी शहर रामसार येथे या कराराचा स्वीकार करण्यात आला होता.
महाराष्ट्र राज्याबाबत महत्वपूर्ण माहिती
-
मुख्यमंत्री: उद्धव ठाकरे हे सध्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळत आहेत.
-
राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी हे सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.
-
राज्य स्थापना वर्ष: १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती.
-
राजधानीचे ठिकाण: मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.
-
भौगोलिक वैशिष्ट्य: क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक लागतो.